Model Injured While Kissing: पहिलं प्रेम, पहिला स्पर्श, पहिल्यांदा मारलेली मिठी आणि पहिलं किस या गोष्टी अनेकांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतात. हे क्षण व त्यांच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत असेही काही जण म्हणतात. पण अलीकडेच एका मॉडेलच्या पहिल्याच डेटवर असं काही घडलं की खरंच ती आयुष्यभर हा प्रियकर व त्याचा प्रताप विसरू शकणार नाही. डेटवर गेलेल्या या मॉडेलला पहिल्या किसनंतर थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. इतकंच नव्हे तर तिथे तिच्या जिभेची सर्जरी सुद्धा करण्याची वेळ आली. असं नक्की घडलं तरी काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना.. या मॉडेलने स्वतःचं सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेची आपबिती सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुर्कस्तानमधील Ceyda Ersoy असे या तरुणीचे नाव असून ती मॉडेल आहे. ३४ वर्षीय सेडा एर्सोईने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती एका मुलासोबत पहिल्या डेटवर गेली होती. या दोघांनी फ्रेंच किस करताना तो तरुण इतका बेभान झाला की त्याने सेडाची जीभ चावली व त्यातच तिची जीभ कापली गेली. जेव्हा ते दोघे थांबले तेव्हा सेडाचे तोंड रक्ताने माखले होते. शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

हे ही वाचा << Video: तरुणी धावत्या बाईकवर घेत होती झोका, मागून जोडपं वेगात आलं अन्.. नेटकरी म्हणतात “पप्पाची परी.. “

द सनच्या वृत्तानुसार, सेडा म्हणाली की कदाचित तिच्या बॉयफ्रेंडला फ्रेंच किस कसे करावे हे माहित नव्हते. सेडा एर्सोई ही एक प्रसिद्ध तुर्की मॉडेल आहे. २०१० मध्ये तिने मिस फोटोमॉडेल हा किताबही जिंकला आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर त्याचे ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत