आपल्या देशात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. आज व्हॅलेंटाईन डे होता. यानिमित्ताने बिहारचा एक तरुण ‘बॉयफ्रेंड ऑन रेंट’ (Boyfriend On Rent)ची पाटी घेऊन संपूर्ण शहरात फिरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण लोकांना प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत होता. फोटोमध्ये आपण पाहू शकतो, या तरुणाने बिहारमधील राज किल्ला, चर्च, दरभंगा टॉवर, दरभंगाचा बिग बाजार यासह अनेक गर्दीच्या ठिकाणी पोस्टरसोबत पोज दिली. त्याचबरोबर हा फोटो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट केला जात आहे. सध्या हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोक त्याला पसंती देत आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाचे नाव प्रियांशु आहे. तो दरभंगा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहे. प्रियांशु सध्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेला घेऊन बराच चर्चेत आहे. यापूर्वी प्रियांशूने ख्रिसमसनिमित्त दरभंगा चर्चसमोर ‘फ्री हग’ मोहीम राबवली होती. इतकंच नाही तर, गेल्या महिन्यात त्याने यूपीच्या बनारसमध्येही अशी मोहीम राबवली होती आणि या मोहिमेत त्यांचे लोकांकडून कौतुक झाले होते.
रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे
प्रियांशूने माध्यमांशी बोलताना सांगितले, एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना आणि तरुणांना प्रेमाचा संदेश देणे हा ‘बॉयफ्रेंड ऑन रेंट’ या मोहिमेचा उद्देश आहे. या पोस्टरच्या माध्यमातून तो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, त्याला तरुणांना हा संदेश द्यायचा आहे की, केवळ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड सोबतच्या अफेअरमध्ये तुमच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवू नका, तर तुमच्या तरुणाईचा देशासाठी वापर करा.
राज किल्ल्यासारख्या ठिकाणी काढलेला हा फोटो व्हायरल करण्यामागे त्याचा उद्देश उद्ध्वस्त झालेल्या वारशाच्या संवर्धनाकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे आहे. दरभंगा राज किल्ला महाराजांनी बांधला. मात्र आज ती जीर्ण अवस्थेत आहे. किल्ल्यासमोर घाण व पाणी साचले आहे. या ठिकाणी काढलेला त्याचा अनोखा फोटो पाहणाऱ्यांचे डोळे किल्ल्याच्या बिकट अवस्थेवर खिळतील, असे त्याने सांगितले. या हेतूने त्याने राजवाड्याजवळ ‘बॉयफ्रेंड ऑन रेंट’चा फोटो काढला आणि तो व्हायरल झाला.