काही व्यक्ती प्रेमाच्या भरात अशा काही गोष्टी करून जातात ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. प्रेम आंधळं असतं ही म्हण आपण अनेकदा ऐकली तर असेल. पण ही म्हण सत्यात उतरवणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. एक प्रियकर नववधूचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी पोहचला. विशेष म्हणजे त्यावेळी तिचं लग्न सुरु होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववधू बनून प्रियकर पोहचला प्रेयसीच्या घरी

नवरी मुलगी लग्नाच्या गजबडीत होती आणि लग्नाची तयारी देखील जोरात सुरू होती त्याचवेळी तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. हा व्यक्ती अगदी नव्या नवरीप्रमाणे तयार झाला होता. त्याने लाल साडी, केसांचं विग, बांगड्या, विविध आभूषण परीधान करण्यासोबतच मेकअप देखील केला होता. तथापि, प्रेयसीच्या घरच्यांना याबद्दल शंका येताच प्रियकराचा प्लॅन फसला. मुलीच्या नातेवाईकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. या घटनेनंतर काही वेळातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : नव्या आयफोन १४ प्रो सीरिजमध्ये अ‍ॅपल करणार ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या कसे असेल नवे मॉडेल

प्रियकर अडकला प्रेयसीच्या नातेवाईकांच्या गराड्यात

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, हा पकडला गेलेला प्रियकर त्याच अवतारात प्रेयसीच्या नातेवाईकांच्या गराड्यात अडकला आहे. हा व्यक्ती घाबरलेला आणि त्याच बरोबर रागात दिसतोय. काही लोक त्याच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा व्यक्ती संपूर्ण ताकदीनिशी आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करतोय.

अखेरीस घटनास्थळाहून पळून जाण्यास प्रियकर यशस्वी

या योजनेमुळे आपण आरामात आपल्या प्रेयसीच्या खोलीपर्यंत पोहचू असे या प्रियकरास वाटले होते. पण दुर्दैवाने त्याची ही योजना फसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना बोलावण्याआधीच प्रियकर आपल्या मित्रांच्या मदतीने त्या ठिकाणाहून पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend reached at girlfriends wedding see what happened next pvp