Viral video: शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काही जण मग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असंच स्नेहसंमेलन १० वी च्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भरवलं होतं. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि वर्ग मित्रांसमोर त्यांची कला सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मित्रांनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. .हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण शाळेच्या जुन्याआठवणीत हरवून गेले. इतक्या वर्षांनंतरही शाळेतली नाती जपत या मंडळींचं एकत्र येणं आणि पुन्हा तेच दिवस जगणं हे सर्वकाही पाहताना नेटकऱ्यांनाही त्यांची शाळा आठवली. 

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा म्हणजेच जुन्या आठवणी ताजा करण्यासाठी गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोदन केलं होत. यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जमले होते. यावेळी लहान असतानाच्या आठणी ताजा करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी नाच रे मोरा आंब्याच्या वानत नाच रे मारो नाच या प्रसिद्ध मराठी गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळे माजी विद्यार्थी आणि शिक्षक बसलेले आहेत.  त्यांचा हा डान्स बघून सगळे आनंदी झाले आहेत, एक वेगळाच जोष सगळ्यांमध्ये आला असून सगळ्यांनीच याचा पुरेपूर आनंद लुटल्याचं दिसत आहे. सर्वजण यामध्ये रमून गेले होते, तर अनेकांना या तरुणांचा डान्स पाहून हसू आनावर झालं होतं.

2

/

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस

सोशल मीडियावर हा व्हिडीओ anand_resort__panhala नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “आयुष्यात आपण कितीही मोठे झालो कितीही वयस्कर झालो तरीही आपल्या बालमित्रांसाठी आपण लहानच असतो आणि लहानपणामध्ये जो निर्मळ आनंद आपण जगत असतो तो आयुष्यभरासाठी विस्मरणीय असतो.” असा आशय लिहला आहे. तर नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकानं म्हंटलंय, “हा आनंद पैशात विकत घेता येणार नाही” तर आणखी एकानं खूपच छान अशी प्रतिक्रिया दिली आहे.