रणरणत्या उन्हाळ्यानंतर पाऊस सुरू झाला की पाणी, हिरवळ आणि डोंगरप्रेमी पर्यटक व ट्रेकर… त्यातही नवाट ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येतील तो शनिवार रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेक धंदेवाईक मंडळी ही संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात आणि इथून पुढे खरा धोका सुरू होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकजण ट्रेकिंगला जाताना स्वत:ची वाहने घेऊन जातात. मात्र ही वाहन ट्रेकिंग सुरु करण्याआधी पायथ्याशी लावतात आणि मार्गस्थ होतात. पुन्हा परतल्यानंतर आपआपली वाहनं घेऊन घराकडे वळतात. तुम्हीही यातलेच असाल तर या भयंकर घटनेचा व्हिडीओ पाहा…पर्वतरांगामध्ये थोडासा निष्काळजीपणा केला तरी मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. ट्रेकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या एकोले वॅली येथे काल अशीच एक घटना घडली.

काही तरुण येथे ट्रेकींगसाठी आले होते. यावेळी तरुणांनी सपाट जागा असलेल्या ठिकाणी आपली वाहने दुचाकी उभ्या केल्या. त्यानंतर ते ट्रेकींगला गेले. ते पुन्हा परतले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांची संपूर्ण वाहने जळून खाक झाली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळ्या गाड्यांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. तरुणाईसाठी आपली बाईक, गाडी म्हणजे जीव की प्राण असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फक्त बाईकच नाही तर कारसुद्धा जळून खाक झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कशी बनवली जाते सोन्याची चैन? पूर्ण प्रोसेस बघून व्हाल अवाक्; VIDEOला २० मिलियन व्हिव्ज

११ फेब्रुवारी २०२४ रोजी एकोले वैली, लोटस पॉइंट, याठिकाणी ट्रेकला आलेल्यांनी आपली वाहने सुकलेल्या गवतावर पार्क करुन ट्रेकसाठी गेले. मात्र त्यानंतर गवताला अचानक लागलेल्या आगीमुळे कित्तेक वाहने जाळून खाक झाली. हा व्हिडीओ atrangitrekkers या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.