Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते. खरं तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते, असं म्हटलं जातं. आयुष्य हे फक्त आनंदी राहणं, हसणं किंवा मजा-मस्ती करण्यापुरतं मर्यादित नसतं. आयुष्यात कधी कधी थोडे दु:ख, संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते; तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. शिकण्याच्या वयात जेव्हा खांद्यावर पुस्तकांच्या आधी जबाबदारीचं ओझं येतं ना तेव्हा नको ते कामही करावं लागतं. अशाच काही तरुणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.

विशाल समुद्रात उदरनिर्वाहासाठी प्राणांची बाजी

Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Find out what happens to the body if you drink lauki juice once a week during summer health benefits of doodhi lauki bottle gourd
आठवड्यातून एकदा दुधीचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज

आपण आपल्या आजूबाजूला अशीही काही मुलं पाहतो; जी व्यसन, नशा, ड्रग्स यांच्या आहारी गेली आहेत. आई-वडिलांचा पैसा वाया घालवत ती मुलं चुकीची कामं करीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही अशी मुलंही असतात की, ज्यांच्या खांद्यावर परिस्थितीमुळे कमी वयातच जबाबदारीचं ओझं येतं. या सगळ्यात ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं असतं, त्यांनाही कधी कधी परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, तर कधी कधी काही पैशांसाठी नको ते काम त्यांना करावं लागतं. अशाच काही तरुणांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जबाबदारी आणि चार पैशासाठी हे तरुण स्वत:च्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. पोटासाठी सुरू असलेला त्यांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अथांग समुद्र दिसत आहे आणि या समुद्राच्या मधोमध एक बोट आहे. या बोटीवर तीन तरुण उभे राहिलेले दिसत आहेत. यावेळी मासेमारी करण्यासाठी हे तरुण या बोटीतून आलेले आहेत. मात्र,या विशाल समुद्रात मासेमारी करणं सोपं नाही हे आपल्यालाही माहीत आहे. मात्र, पोटासाठी जीवाची बाजी लावून हे तरुण मासे पकडायची जाळी पकडून समुद्रात उडी मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी कोणतीही सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. म्हणजेच कोणतंही लाईव्ह जॅकेट घातलेलं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक लाट अन् चिमुकली बघता बघता दिसेनाशी झाली; समुद्राच्या लाटेत किती ताकद असते पाहाच; थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर official_vishwa_96k नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “घरची जबाबदारी माणसाला खूप काही करायला भाग पाडते.” यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.