Wild Boar VIral Video : रानावनात भटकणाऱ्या प्राण्यांना पकडण्यासाठी अनेकांना कंबर कसावी लागते. ससा, रानडुक्कर पकडताना गावाकडच्या माणसांच्याही नाकी नऊ येतात. कारण वाऱ्यासारखे धावणारे हे प्राणी सहज पकडता येत नाही. त्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. अशाच प्रकारची भन्नाट युक्ती गावाकडच्या मुलांनी केली आणि जंगलातून सुसाट धावणाऱ्या एका रानडुक्कराला सापळ्यात अडकवलं. रानडुक्कर माणसांवर हल्लेही करतात. रानडुक्कर पिसाळल्यावर माणसांच्या अंगावर धावून येतो. पण एका गावात नेमकं उटल झालं आहे. गावातील मुलांनी रानडुक्कराला पकडण्यासाठी हिंमत दाखवली. एका पिशवीच्या सापळ्यात धावत येणारा रानडुक्कर कसा अडकतो? हे व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
रानडुक्कर अंगावर धावला अन् मुलांनी मोठा डावपेच आखला, पाहा व्हिडीओ
एका घनदाट जंगलात रानडुक्कर भरधाव वेगानं रस्त्यावरून जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याच रस्त्यावर काही मुलं हातात पिशवी घेऊन रानडुक्कराला पकडण्यासाठी सापळा रचताना दिसत आहेत. रानडुक्कर अंगावर धावल्यानंतरही एका मुलाने न डगमगता त्याला सापळ्यात अडकवलं. त्यानंतर रस्त्यावर असणारे कुत्रेही त्या रानडुक्कराजवळ जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मुलांनी एव्हढा जबरदस्त सापळा रचला की, रानडुक्कराला मोठ्या पिशवीत अडकल्यानंतर बाहेर निघण्याचा मार्गच सापडला नाही. रानडुक्कर पिशवीत अडकल्यानंतर त्या मुलाने त्याला घट्ट पकडून ठेवलं. त्यानंतर त्या मुलासोबत इतरही काही जण रानडुक्कराला पकडण्यासाठी त्याच्याजवळ जाताना व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
@ranthamboresome नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रानडुक्कर हा प्राणी खूप वेगवान आणि चपळ असतो. पण गावाकडे या प्राण्याची शिकार केली जात असल्याच्या काही घटनाही उघडकीस आल्या आहेत. वन विभागातील अधिकारी रानडु्क्कराची शिकार करणाऱ्या माणसांवर कायदेशीर कारवाई करतात. वन्य प्राण्यांना स्वतंत्रपणे जगू देण्यासाठी आणि त्यांना क्रूर वागणून न देण्यासाठी प्राणी मित्र संघटनांकडून नेहमीच जनजागृती केली जाते. गावाकडच्या मुलांनी रानडुक्कर पकडल्याचा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे. कारण रानडुक्कराच्या जवळ जायला काही माणसं घाबरतात. पण या मुलांनी बहादूरी दाखवून रानडुक्कराला त्यांनी रचलेल्या सापळ्यात अडकवलं.