BPSC Teacher Exam: देशातील वाढत्या बेरोजगारीची सर्वाधिक चिंता आजच्या तरुणांना आहे. तरुणांचा असा विश्वास आहे की, आज शिक्षणानंतर नोकरी शोधणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. पूर्वीच्या तुलनेत आज नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. कमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. याच बेरोजगारीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. बिहारमध्ये शिक्षकांच्या एक लाख ७० हजार ४६१ जागांसाठी आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. आज पहिला दिवस आहे. २५ आणि २६ ऑगस्टलाही परीक्षा होणार आहे. आठ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असून बाहेरूनही उमेदवार परिक्षेसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत परीक्षेच्या एक दिवस अगोदर पाटण्यात पोहोचलेल्या उमेदवारांचे हाल सुरु आहेत. कुणाला हॉटेलमध्ये रूम मिळाली नाही, तर कुणी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in