समोरून एक इटुकला पिटुकला उंदीर येताना दिसला तर तुम्ही काय कराल हो? आता या जागी एखादी मुलगी किंवा महिला असेल तर ती नक्कीच आरडाओरडा करून सारं घर डोक्यावर घेईल. पण तेवढं चालतच ना! मुली उंदरांनां घाबरतातच. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण हाच उंदीर जर एखाद्या धडधाकड पोलीस अधिका-याच्या समोर आला तर? तो काय करेल? सरळ शेपूट पकडून त्याला बाहेर फेकून देईल. हो ना! पण तुमचा गैरसमज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की दूर होईल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फार मजेशीर असा हा व्हिडिओ आहे. एक पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनच्या खोल्यामध्ये काहीतरी काम करण्यात गुंग आहे, काम करून झाल्यानंतर निघताना त्याच्या वाटेत आला इटुकला पिटुकला उंदीर.

आता या उंदराला पाहून धडधाकड पुरूष काय करेल. फारफार तर बाचकेल. पण या पोलिसांनी मात्र समोर आलेल्या उंदराला पाहून एका लहान मुलासारखी जीव मुठीत धरून धुम ठोकली. थोड सुरक्षित अंतर कापून आल्यानंतर त्याने उंदीर गेला की नाही याची खात्री करून घेतली. हा मजेशीर व्हिडिओ समोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Story img Loader