जेंडर रिव्हील पार्टी ही पद्धत आता काही नवीन राहिलेली नाही. आपल्या भारत देशात गर्भलिंग निदान करणे बेकायदेशीर आहे. पण तरीही विदेशात मात्र अनेक जोडपी भव्यदिव्य सोहळा आयोजित करून मुलगा की मुलगी हे जाहीर करतात. हल्ली तसा ट्रेंडच सुरूये. याला जेंडर रिव्हील पार्टी असं म्हणतात. यामध्ये अनेक सांकेतिक गोष्टींचा वापर करून मुलगा की मुलगी हे जाहीर करतात. यात आकाशी रंग असला की मुलगा आणि गुलाबी रंग असला की मुलगी असं समजलं जातं. सध्या अशाच एका जेंडर रिव्हील पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जोडप्यांनी मुलगा की मुलगी हे जाहीर कऱण्यासाठी अख्खा धबधबाच निळ्या रंगाने रंगवला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मात्र टिकेला सुरूवात केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेंडर रिव्हील पार्टीचा हा व्हिडीओ गेल्या रविवार, २५ सप्टेंबरचा आहे, जो ब्राझीलमधील माटो ग्रोसो इथे शूट करण्यात आला. या जेंडर रिव्हल पार्टीमध्ये एक मुलगा होणार आहे हे सूचित करण्यासाठी जोडप्याने निळ्या रंगाने १८ मीटर उंच धबधबा रंगवला. हा धबधबा पूर्णपणे निळ्या रंगात रंगला होता. व्हिडीओच्या मागील बाजूसही फुगे सजवण्यात आले आहेत. जरी या जोडप्याला वॉटरफॉल डाईने रंग देण्याची कल्पना आवडली असली, तरी सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या कृतीवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन लोकांना समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सलमान खानच्या ‘ओह ओह जाने जाना’ गाण्यावर टांझानियन तरूण किली पॉलचा नवा VIDEO VIRAL

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर vanecosta1O नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, हा व्हिडीओ ३६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, अनेक यूजर्स या जोडप्याला तुरुंगात पाठवण्याची मागणी करत आहेत. एका यूजरने लिहिले की, १० वर्षे तुरुंगवास त्यांच्यासाठी खूप आहे.