करोनामुळे वर्क फॉर्म होम कल्चर नंतर आता झूम मीटिंग खूप लोकप्रिय झाली आहे. कामाच्या वेळापत्रकामुळे, हे व्यासपीठ आता मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. करोना काळात ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला भेटणे खूप कठीण झाले होते. अशा स्थितीत त्या काळात फक्त झूम मीटिंग्सने युजर्सना खूप साथ दिली. पण, याचे अनेक अनेक तोटे देखील आहेत. कोरोना महासाथीदरम्यान ऑनलाइन मीटिंग आणि ऑनलाइन क्लासच्या सुविधांचा ट्रेंड खूप वाढला आहे. यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे बऱ्याच जणांना तोंड लपववावं लागलं आहे. यामध्ये अगदी कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थी तसेच नेते मंडळीही ऑनलाईन मीटिंगद्वारेच संवाद साधत होते. दरम्यान अशाच काही नेत्यांची ऑनलाईन मीटिंग सुरू होती. यामध्ये एक नेता टॉयलेटमध्ये बसून मीटिंग अटेंड करत होता. त्यावेळी चुकून त्याच्याकडून कॅमेरा ऑन झाला आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
ब्राझीलच्या रिओ डी जनेरियोमध्ये ही घटना घडली आहे. मिरांते दा रोसिन्हाला सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त करण्याच्या विधेयकावर नगरसेवक पाब्लो मेलो यांच्या अध्यक्षतेत ही मीटिंग सुरू होती. रिओ डी जनेरियोचे तीन वेळा महापौर राहिलेले सीझर मेयो हे टॉयलेटमध्ये बसून मीटिंग अटेंड करत होते. यावेळी चुकून कॅमेरा ऑन झाला आणि हा तेव्हा हा प्रकार घडला.
हेही वाचा >> VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
आधीही असंच प्रकरण समोर आलं होतं
अशीच एक घटना साऊथ कोरियातून समोर आली आहे. येथे एका प्रोफेसरने ऑनलाइन मीटिंगमध्ये असं काही केलं की, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आणि प्रोफेसरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना साऊथ कोरियातील हॅनयँग विद्यापीठातील आहे. येथे एक प्रोफेसर विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि त्यांची मीटींगदेखील अटेंड करीत होते. क्लास ऑडिओ कॉलने सुरू होती. मात्र या गडबडीत चुकून प्रोफेसरचा व्हिडीओ कॉल ऑन राहिला. मात्र कॅमेरा सुरू असल्याचं प्रोफेसरला माहिती नव्हतं. यानंतर जे काही झालं याचा त्यांनी विचारही केला नसेल.
हेही वाचा >> पेट्रोल भरताना फोनची रिंग वाजली अन् बाईक पेटली; चूक नक्की कुणाची? संभाजीनगरचा थरारक VIDEO व्हायरल
प्रोफेसर अचानक आपले कपडे काढू लागतो आणि बाथरूममध्ये शिरतो. इतकच नाही तर बाथरूमचा दरवाजादेखील खुला राहिला होता. जेव्हा त्याने आंघोळ करण्यास सुरू केली, तर सर्व विद्यार्थी हैराण झाले. कारण बाथरूमच्या समोरच लॅपटॉप ठेवला होता. ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व स्पष्ट दिसत होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी आपला लॅपटॉप बंद केला.