करोनामुळे वर्क फॉर्म होम कल्चर नंतर आता झूम मीटिंग खूप लोकप्रिय झाली आहे. कामाच्या वेळापत्रकामुळे, हे व्यासपीठ आता मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. करोना काळात ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला भेटणे खूप कठीण झाले होते. अशा स्थितीत त्या काळात फक्त झूम मीटिंग्सने युजर्सना खूप साथ दिली. पण, याचे अनेक अनेक तोटे देखील आहेत. कोरोना महासाथीदरम्यान ऑनलाइन मीटिंग आणि ऑनलाइन क्लासच्या सुविधांचा ट्रेंड खूप वाढला आहे. यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे बऱ्याच जणांना तोंड लपववावं लागलं आहे. यामध्ये अगदी कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थी तसेच नेते मंडळीही ऑनलाईन मीटिंगद्वारेच संवाद साधत होते. दरम्यान अशाच काही नेत्यांची ऑनलाईन मीटिंग सुरू होती. यामध्ये एक नेता टॉयलेटमध्ये बसून मीटिंग अटेंड करत होता. त्यावेळी चुकून त्याच्याकडून कॅमेरा ऑन झाला आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा