फिफा फुटबॉल विश्वचषकाचे सामने कतारमध्ये होत असून शुक्रवारी ब्राझील विरुद्ध क्रोएशिया असा रंगतदार सामना झाला. पेनेल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाने ४-२ ने आघाडी करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. बलाढ्य ब्राझील संघाला क्रोएशियाने पराभूत केल्यानंतर अनेक फुटबॉट प्रेमींच्या भुवया उंचावल्या. कारण यापूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये ब्राझीलने फुटबॉल खेळात यशाच्या उंच शिखरावर गरुड झेप घेतल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. फुटबॉल खेळात ब्राझिलचा दबदबा आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. ब्राझिलचा पराभव जरी झाला असला, तरी संपूर्ण जगात याच संघाचा बोलबाला आहे, असा संदेश ब्राझिलच्या एका चाहत्यानं अनोखा पोशोख घालून दिला आहे. विलक्षण असा मिरर आऊटफिट घालून या चाहत्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कारण संपूर्ण शरीरावर काचेत बनवलेल्या कपड्यांची झालर पसरलेला या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
ब्राझिल संघाच्या एका चाहत्यानं भन्नाट ड्रेस घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका अनोख्या मार्गाने आपल्या संघाप्रती प्रेम दर्शवणाऱ्या या चाहत्याच्या व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजला आहे. ब्राझिल संघाला प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो चाहते मैदानात धाव घेतात. पण ब्राझिलच्या एका चाहत्यानं कमालच केली आहे. संपूर्ण शरीर काचांनी झाकून एक अनोखा पोशाख घालून ब्राझिलचा चाहता मैदानात पोहोचला. त्यानंतर त्यानं घातलेले कपडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
इथे पाहा व्हिडीओ
हा तरुण एआर फिल्टरप्रमाणेच चालत असल्याचं अनेकांना वाटत आहे. हा व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “विश्वचषकाच्या पोशाखाच्या इतिहासातील हा सर्वात चांगला पोशाष असू शकतो.” दुसऱ्या एकाने म्हटलं, “मला हा पोशाख खूप आवडला”. हे खूप सुंदर आहे, या तरुणाने या भन्नाट कल्पनेबाबत स्पष्ट सांगावं, अशी आशा आहे.” असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं.