मासिक पाळीचे रक्त चेहऱ्यावर लावण्यासाठी आधी प्रसिद्धी मिळवणारी ब्राझिलियन मॉडेल डेबोरा पेक्सोटो, तिच्या विचित्र स्किनकेअर दिनचर्येमुळे पुन्हा इंटरनेटवर चर्चेत आली आहे. एका इंस्टाग्राम रीलमध्ये, पेक्सोटोने दावा केला की ‘Poop (मानवी विष्ठा)मास्क’ वृद्धत्व टाळू शकतो.
इन्फ्लुएंसरने फेस मास्क म्हणून तोंडाला लावली ‘मानवी विष्ठा’
व्हायरल व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर रेफ्रिजरेटरमधून एक लहान कंटेनर काढताना दिसत आहे, जिथे ती तिची मानवी विष्ठा साठवते. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे ती तिच्या चेहऱ्यावर विष्ठा लावते. ती वास टाळण्यासाठी तिचे नाकाला क्लिप लावते. व्हिडिओच्या शेवटी ती तिचा चेहरा स्वच्छ करते आणि कॅमेरासमोर दाखवते.”
. पोर्तुगीज भाषेतू मधून इंग्रजीमध्ये केलेल्याढोबळ भाषांतरानुसार कॅप्शनमध्ये महिलेने सांगितले की, “माझ्या आयुष्यात मी केलेली सर्वात विलक्षण गोष्ट, मी माझी विष्ठा माझ्या चेहऱ्यावर लावली, मी याबद्दल एक अभ्यास पाहिला आणि प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला! हे माझ्यासाठी फायदेशीर ठरले.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा:
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली टिका
व्हिडिओने अनेक सोशल मीडिया वापरकर्ते आणि तज्ज्ञांना नाराज केले. त्यावर प्रतिक्रिया देताना एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, “यामध्ये पौष्टिक काहीही नाही, हे सर्व विषारी आहे जे तुम्ही खातात त्या अन्नातून उरले आहे!!!!”
“तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे, असे वागताना,” असे आणखी एका वापरकर्त्याने लिहिले. “म्हणजे…आम्ही सर्व मान्य करू शकतो की आपल्या आतडे विषारी पदार्थ काढून टाकतात आणि आपल्या शरीराला त्याची गरज नसते,” दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले.
2022 मध्ये, सोशल मीडियाने आणखी एक विचित्र ट्रेंड जन्माला घातला होता जिथे इन्फ्लुएंसरने मासिक पाळीचे रक्त त्यांच्या चेहऱ्यावर चोळले कारण त्यांच्या मते, मासिक पाळीच्या रक्तामध्ये “सर्व स्टेम पेशी आणि सर्व पोषक घटक असतात ज्या बाळासाठी आवश्यक असते आणि अर्थातच, तुमच्या त्वचेला आणि शरीराला आवश्यक असते.”