मेलेली माणसं कधीच परत येत नाहीत, पण काही जण हे सत्य मात्र स्वीकारायला तयार नसतात. आपली प्रिय व्यक्ती आपल्यात नाही हे त्यांना मान्यच होत नाही. कधी कधी तर हे दु:ख इतकं तीव्र होत जातं की त्या दु:खात ती व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. ब्राझीलमधल्या लोकांना याचा प्रत्यय  काल आला. २९ वर्षीय रोसाने आपल्या मृत भावाची पुरलेली शवपेटी बाहेर काढली. अन् आपल्या सायकलवर ही शवपेटी बांधून तो रात्री गल्लोगल्ली भटकत होता. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोसाच्या भावाचा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, पण रोसाला मात्र आपल्या भावाचं दु:ख काही केल्या पचवता येत नव्हतं. त्याला आपल्या भावाची एवढी आठवण छळू लागली की त्याने भावाची कबर खोदली आणि त्याच्याशी गप्पा मारत बसला. इतकंच नाही तर त्याचा मृतदेह असलेली शवपेटी सायकलला बांधून तो भ्रमंतीला देखील निघाला. या विचित्र प्रकाराने सगळेच घाबरून गेले. तेव्हा काहींनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी रोसाला अटक केली खरी पण त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. आपला भाऊ एक दिवसांपूर्वी स्वप्नात आला असून माझ्या सायकलवरून फिरण्याची त्याची खूप इच्छा होती म्हणूनच ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्याला कबरीतून बाहेर काढलं असं उत्तर त्याने पोलिसांना दिलं. तर दुसरीकडे दफनभूमीतून भावाचा मृतदेह बाहेर काढून त्याच्याशी बोलतानाही अनेक लोकांनी पाहिलं. रोसाच्या या कृतीबद्दल पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात केली.