Instagram Model and Wellness Influencer Kat Torres : सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर रिल आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या फॉलोअर्ससमोर जे चित्र निर्माण करतात, ते नेहमीच सत्य असते असे नाही. सोशल मीडियावर बहुतेक इन्फ्लूएन्सर आभासी जग दाखवत असतात. ब्राझीलची पूर्वाश्रमीची मॉडेल आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर कॅट टॉरेसच्या काळ्या कृत्यांचा असाच प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर भव्य-दिव्य अशी जीवनशैली, सेलिब्रिटींबरोबर ओळख, अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओशी प्रेमसंबंध असल्याच्या दाखविणाऱ्या कॅट टॉरेसला आता आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अनेक महिलांना सेक्स स्लेव्ह करणे आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली तिला अटक झाली आहे. २०२२ साली ब्राझीलच्या दोन महिला बेपत्ता झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या महिलांना कॅटने गुलाम केले होते, अशी माहिती एफबीआयने दिली आहे.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला

हे ही वाचा >> PHOTOS : जगातली पहिली ‘एआय’ मॉडेल्स सौंदर्य स्पर्धा; अंतिम फेरीत भारताची ‘झारा शतावरी’! ‘इतकी’ आहे बक्षिसाची रक्कम

कॅट टॉरेसला अमेरिकेत सोशल मीडियावर खूप लोक फॉलो करतात. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार कॅट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून महिला फॉलोअर्सभोवती लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषणाचा फास टाकत असे. एवढेच नाही तर तिने अमेरिकेतील नैराश्यग्रस्त किंवा उपेक्षित असलेल्या महिलांचा एक गटही तयार केला होता. या गटाला ती आध्यात्मिक उपदेश करत असे.

गरीबीतून श्रीमंत होण्याचा आभासी संघर्ष

बीबीसीशी बोलताना ॲना नावाच्या पीडित महिलेने कॅटबाबतचा धक्कादायक अनुभव कथन केला आहे. कॅट ब्राझीलमधील अतिशय गरीब कुटुंबातून आणि हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आली होती. तिचा संघर्ष आम्हाला प्रेरित करायचा. तिच्याकडे बघून मला जीवनाबद्दल आशा वाटायची. २०२२ साली ज्या दोन महिला बेपत्ता झाल्या त्यामध्ये ॲनाचा समावेश नव्हता. मात्र नोव्हेंबर २०२३ मध्ये ॲना कॅटच्या जाळ्यात अडकली होती. कॅटने तिच्या गरीबीतून श्रीमंतीकडे गेलेल्या आभासी कथेत मला फसवले होते, असे ॲनाने सांगितले.

ॲनाने पुढे म्हटले की, ती मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकायची. तिची उठबस मोठमोठ्या लोकांबरोबर होती. अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओशी तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे कॅटचा प्रवास आम्हाला स्वप्नवत असा वाटत होता.

kat torres
कॅट टॉरेस धान्यधारणेचे वर्ग घेत असे. यासाठी ती पैसे आकारायची. (Kat Torres Instagram)

आध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा

न्यूयॉर्कमध्ये कॅट टॉरेसबरोबर एकत्र राहिलेल्या आणखी एका महिलेने बीबीसीशी बोलताना सांगितले की, कॅटच्या हॉलिवूडमधील मित्रांनी तिला ayahuasca नावाच्या एका अमली औषधाची माहिती दिली होती. या औषधाच्या वापरातून कॅटने स्वतःला जीवनशैलीबाबत प्रशिक्षण देणारी आणि हिप्नोटिस्ट म्हणून ओळख मिळवली.

पुढे जाऊन कॅटने स्वतःचे व्हेलनेसबाबतचे संकेतस्थळ निर्माण केले. या संकेतस्थळावरून तिने पैसे घेऊन ग्राहकांना प्रेम, पैसा आणि स्वाभिमान मिळविण्याबाबतचे स्वप्न विकले. तसेच सेल्फ हेल्प पद्धतीचे व्हिडीओ तयार करून कॅट इतरांना नातेसंबंध, व्हेलनेस, व्यावसायिक यश, ध्यानधारणा आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन करत होती. आपल्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एका व्हिडीओ समुपदेशनाचे ती १५० डॉलर आकारत होती.

kat torres leonardo dicaprio
अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओशी प्रेमसंबंध असल्याची अफवा उठविण्यात आली होती.

फॉलोअर्सना सेक्स स्लेव्ह बनविले

बीबीसीला माहिती देणाऱ्या ॲनाने सांगितले की, कॅटबरोबर काम करण्यासाठी ती ब्राझीलहून न्यूयॉर्कला आली. इथे कॅटच्या घरातील काम करण्यासाठी तिला महिन्याकाठी दोन हजार डॉलर्स देण्याचे कबूल करूनही कॅटने कधी पैसे दिले नाहीत. कॅटचे घर अतिशय अस्वच्छ होते. ॲनाला बिलकूल आराम करू दिला जायचा नाही. कॅटच्या छळाला कंटाळून ॲनाने तिथून पळ काढला.

त्यानंतर आणखी काही महिला कॅटबरोबर जोडल्या गेल्या. मात्र त्या महिलांना टेक्सासमधील स्ट्रिप क्लबमध्ये काम करण्यासाठी दबाव आणला गेला. तसेच वेश्याव्यवसायात नफा असल्याचेही सांगून कॅटने बळजबरीने या महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले. जर त्या महिलांनी कॅटने दिलेले कमाईचे टार्गेट पूर्ण केले नाही, तर त्यांना घरात घेतले जात नसे.