‘भूतबीत सगळं झूट. अंधश्रध्दा आहे ही. भुतं म्हणजे आपल्या मनातल्या आपल्याच भीतीचं एक स्वरूप. ही मूर्खपणाची कल्पना मनातून काढा आणि आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा’

ही अशी भाषणं आपल्या ओळखीच्यांकडून दर’दिवशी’ एेकायला मिळतात. पण दिवसा बाजीरावांचे आधुनिक अवतार असणाऱ्या यातल्या कितीतरी जणांची रात्र झाल्यावर आपल्यासारखी गत होते. आणि आपण सगळेही बहुतेक त्यातलेच

पण घाबरू नका! या यादीमध्ये ब्राझीलच्या अध्यक्षांचीही आता भर पडलीये. अध्यक्षांनी ‘माझ्या घरात भूत हाय!’ असं ब्राझिलियन भाषेत जाहीर करत चक्क आपला अध्यक्षीय बंगला सोडलाय!

ब्राझीलचं अध्यक्षीय निवास काय खायचं प्यायचं काम नाही. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपेक्षा मोठ्य़ा असणाऱ्या या बंगल्याच्या आवारात एक फुटबाॅल ग्राऊंड, एक मोठ्ठा स्विमिंग पूल, अध्यक्ष महाराजांसाठी एक खास हाॅस्पिटल आणि चालायला किंवा कारने फिरायला मोठमोठी लाॅन्स आहेत!

ब्राझीलच्या अध्यक्षांचा देखणा 'अल्वोरॅडो पॅलेस' (छाया सौजन्य- टाॅप यॅप्स)
ब्राझीलच्या अध्यक्षांचा देखणा ‘अाल्वोराडा पॅलेस’ (छाया सौजन्य- टाॅप यॅप्स)

 

पण ब्राझीलचे अध्यक्ष मायकेल तेमेर यांनी ‘आल्वोराडा पॅलेस’ या आपल्या अधिकृत निवासस्थानात भूत आहे असं म्हणत तिथे राहणं बंद केलंय.

अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर ते या घरात आले, पण पहिल्याच दिवशी त्यांना बरोबर झोप लागत नव्हती. सारखं सारखं ‘कुणीतरी आहे तिथे’चा भास त्यांना होत होता असं साहेब म्हणाले. या घरात त्यांना ‘विचित्र वाईब्स’ येत होत्या. शेवटी अध्यक्षांच्या पत्नीने एका चांगला स्टॅमिना असलेल्या धर्मगुरूला बोलावून संपूर्ण अध्यक्षीय निवासाचं शुध्दीकरण केलं. (चांगला स्टॅमिना का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी परिच्छेद क्रमांक ४ वाचा)

या वाईट जोकची उकल झाली असेल तर पुढे एेका. हे सगळं शुध्दीकरण वगैरे झाल्यावरही अध्यक्षांना येणारे हे वाईच वाईब्स कमी झाले नाहीत. आणि त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आता ते ब्राझीलच्या उपाध्यक्षांच्या ‘जबुरू पॅलेस’या निवासस्थानामध्ये शिफ्ट झालेत.

ब्राझीलच्या उपाध्यक्षांचं पद सध्या रिकामं आहे. त्यामुळे त्यांचं घर रिकामं असणं अध्यक्षमहोदयांच्या चांगलंच पथ्यावर पडलं म्हणायचं!

Story img Loader