Bread-Making Procedure: ब्रेड हा अनेक घरांमध्ये नेहमी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साध्या चहा ब्रेडपासून ते ब्रेड पॅटीसपर्यंत अनेक पदार्थ तयार करण्यासाठी आपण ब्रेड वापरतो. तुम्ही नेहमी खात असलेला ब्रेड नक्की कसा तयार केला जातो हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर मग हा फॅक्टरीमधील व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरमधील एका फॅक्टरीचा आहे. व्हिडीओमध्ये असंख्य ब्रेड एकाच वेळी कसे तयार केले जातात हे तुम्ही पाहू शकता. ब्रेड तयार करताना कोणत्याही प्रकारची स्वच्छता बाळगलेली नाही हे पाहून तुमची निराशा होई शकते.
व्हिडिओच्या सुरुवातीला, एक कामगार एका भांड्यात मैदा आणि यीस्ट टाकत आहे नतंर ते मीश्रण एका पीठ मळण्याच्या मशीनमध्ये टाकतो. मशीनमध्ये पाणी टाकले जाते. पीठ मळताना मशीनला चिकटू नये यासाठी कामगार त्यात तेलही टाकतो. नतंर तयार पीठाचे तुकडे करून त्यांना साच्यामध्ये ठेवले जाते. हे साचे एका स्टॅंडला लावून ब्रेड भाजण्याच्या भट्टीत किंवा ओव्हनमध्ये टाकले जातात. काही वेळाने ब्रेड भाजून तयार होतोय हे गरम ब्रेड एका चटईवर थंड करण्यासाठी ठेवले जातात. त्यानंतर एका कॅरटमध्ये भरले जातात. त्यानंतर ब्रेड कापण्यासाठी एका मोठ्या मशीनमध्ये टाकले जातात. नंतर एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये तो ब्रेड भरला जातो. कामगारांनी ब्रेड तयार करताना कोणतेही हातमोजे घातलेले दिसत नाही. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी! कसा तयार झाला ‘हा’ भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ?
याआधी, गोव्याचा ब्रेड पोई बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मैद्यासह संपूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर करून सपाट गोल आकाराचा ब्रेड बनवला जातो. क्लिपमध्ये बेकरीमधील कामगार पीठासाठी विविध घटकांचे मोजमाप आणि मिश्रण करताना दिसत आहे. अर्धी प्रक्रिया हाताने केले जाते उर्वरित प्रक्रिया मशीनद्वारे केली जाते. पीठ तयार झाल्यावर, कामगार त्या; लहान गोलाकार आकार देतात, जे नंतर चटईवर रांगेत ठेवलेले असतात. हे ब्रेड पारंपारिक भिंतीच्या ओव्हनमध्ये भाजले जातात आणि तुकडे लांब काठीने हाताळले जातात.
कॅप्शनमध्ये, वापरकर्त्याने सांगितले आहे की हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्या गावातील एका बेकरीमध्ये शूट केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की टावरेस (Tavares) बेकरी’ “मिस्टर लिगोरियो टावरेस (Mr. Ligorio Tavares) यांनी १९५६ मध्ये स्थापन केली होती आणि त्यांची दोन मुले रोमी टावरेस (Romy Tavares) आणि (बार्थोलोमियो टावरेस यांनी त्यांच्या कुटुंबासह ही बेकरी यशस्वीरित्या चालवतात.”
हेही वाचा – मी जाणार नाही अन् तुलाही…”; पुण्याच्या तरुणीने अडवली रिक्षाची वाट, रिक्षचालकाला शिकवला धडा
“हा व्हिडीओ गोव्यातील पारंपारिक बेकर्सच्या आयुष्यातील एक दिवस दर्शवत आहे. त्यांना गोव्यात (पोदेर) Poder असे म्हणतात. ‘Poder’ हा शब्द ‘Padeiro’ या पोर्तुगीज शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे बेकर. गोव्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात पोदेरच्या मैत्रीपूर्ण संवादाने करतात. जेव्हा लोक त्यांच्याकडून ब्रेड घेतात तेव्हा एकमेकांना शुभेच्छा देतात. पोदेर ही केवळ आपल्या घरापर्यंत ब्रेड पोचवणारी व्यक्ती नाही, तर हे लोक खरे माहित नसलेले हिरो आहेत. हे काम करण्यासाठी लागणारे समर्पण अकल्पनीय आहे.” असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.