Kashmir Snowfall Video : पृथ्वीवरील स्वर्ग, अशी जम्मू-काश्मीरची ओळख आहे. कारण- हिवाळा ऋतूत या ठिकाणी सर्वत्र बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरलेली दिसते. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतात. यंदाही उशिरा का होईना जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. हिमवृष्टीमुळे येथील तापमानात घट झाली आहे. जमिनीवर जणू बर्फाचा गालिचा पसरवल्याचा भास होत आहे. अशातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामधील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे; जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सध्या जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग, सोनमर्ग व पहलगाममध्ये जोरदार हिमवर्षाव झाला आहे. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यातील पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित ट्रॅकवरून रेल्वे दिमाखात धावताना दिसतेय. जमिनीपासून सर्वत्र एखादी बर्फाची चादर पांघरल्यासारखे हे सुंदर दृश्य दिसत आहे.
“सपना टूटा है तो दिल…” अर्थसंकल्प सादर होताच मध्यमवर्गीयांबाबत सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
वैष्णव यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काश्मीरच्या खोऱ्यात हिमवर्षाव!” हे दृश्य बारामुल्ला-बनिहाल सेक्शनवरील असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेला हा सुंदर, नयनरम्य व्हिडीओ युजर्सना फार आवडला आहे. त्यावर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी हे मनमोहक आणि खूप सुंदर दृश्य असल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर जगभरातील स्वित्झर्लंड, बेल्जियम, स्वीडन, जर्मनी अशा वेगवेगळ्या सुंदर ठिकाणांची आठवण करून दिली आहे.