Bride and groom dance video: आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ‘हम आपके हैं कौन’ नावाचा सिनेमा आला आणि लग्नाची पद्धतच बदलून गेली. लग्न ‘इव्हेंट’ व्हायला लागलं. संगीत किंवा नवरदेवाचे बूट लपवण्यासारख्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात सुरू झाल्या. लग्नसोहळा ही गोष्ट गेल्या काही वर्षांत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. डान्स पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत हल्ली लग्नामध्ये नियोजन केलं जातं. अशातच आता नवरा-नवरीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा नवरीने खानदेशी संबळच्या तालावर तुफान डान्स केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरी लग्नानंतरच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात नाचत आहेत. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे.डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “भारीच” तर दुसऱ्या एकानं, दोघेही किती खुश आहेत, तर आणखी एकानं “मलाही अशीच बिन्धास्त नाचणारी बायको पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.