Wedding Viral Video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा यr मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोणत्याही लग्नात मजा-मस्ती, गमती-जमती नसल्या तर लग्नात आनंद वाटत नाही. कारण लग्नात सहभागी झालेल्या सर्वांना एन्जॉय करायचं असतं. अनेकदा तर लोक मजा-मस्तीच्या नादात असं काही करतात की, हैराण व्हायला होतं. सोशल मीडियावर नेहमीच लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंचा लोक आनंद घेतात. अशाच लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नवरदेवाच्या मित्रांमुळे भर मंडपात नवरीची इज्जत गेली आहे.

कोणत्याही लग्नात सर्वात जास्त मजा नवरी-नवरदेवाचे मित्र घेतात. रिवाजांदरम्यान ज्याप्रकारणे मित्र वागतात ते बघून नवरी-नवरदेवही हैराण होतात. अनेकदा हे बघून हसूही येतं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एकमेकांना हार घालण्यासाठी तयार आहेत. तेव्हाच नवरदेवाचे मित्र नवरदेवाला वर उचलतात. अशात नवरी फक्त बघत उभी असते. ती नवरदेवाला हार घालू शकत नाही. तेव्हाच नवरीकडचेही नवरीला वर उचलतात. हे पाहून नवरदेवाचे मित्र नवरदेवाला आणखी वर उचलतात यावेळी धक्का लागून नवरी अक्षरश: उलटी खाली पडते. त्यानंतर जे होतं ते बघून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाहुण्यामंडळींनी वधु-वराला उचलून घेतलं. दोघही एमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धा करत आहेत. पण तेवढ्यात उभं राहताना नवरीचं डोकं छताला आदळलं आणि तिचा तोल गेला. यावेळी तिची साडीही व्यवस्थित राहिली नाही. मित्रांच्या मस्करीमुळे भर मंडपात नवरीची मात्र फजीती झाली.

पाहा व्हिडीओ

हा नवरी-नवरदेवाचा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा बघत आहे. शेअर करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @laxmi.ghosh.108889 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावर देत आहेत.

Story img Loader