लग्न हा एक सुंदर क्षण आहे. लोक त्यांच्या लग्नाला खास बनवण्यासाठी काय काय करतात? अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओही व्हायरल होतात. वराच्या डान्सपासून ते नवरीच्या मस्ती आणि सुनेच्या खोडकरपणापर्यंतच्या व्हिडिओला लोकांचे भरभरून प्रेम मिळते. लोकांनाही असे व्हिडिओ पाहायला आवडतात. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये वधू वरासोबत मस्ती करताना दिसत आहे. वधू मस्ती करत वराला पाण्यात ढकलते. हे करत असताना दोघेही पाण्यात पडतात.
काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक रील व्हायरल झालं आहे. रीलमध्ये वधू-वर एकत्र उभे असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की दोघेही फोटो काढण्यासाठी पोझ देण्याची तयारी करत आहेत. वर वधूला फोटोसाठी पोज देण्यास सांगतो. यामध्ये वधू मस्तीमध्ये वराला जवळच्या पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूलमध्ये ढकलते. असे करत असताना वराने तिला पकडले आणि दोघेही पाण्यात पडतात. व्हिडिओच्या शेवटी दोघेही पाण्यात मस्ती करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : स्मार्टफोनचा स्फोट होण्यापासून टाळायचा असेल तर ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी
आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा
wedd_ing_vibes नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडिओ लहान आणि मजेदार आहे. या व्हिडीओला लोकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ८३ हजार पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये हसणारे इमोजी शेअर करत आहेत.