लग्नाचा सीजन असला आणि लग्नाचे हटके व्हिडीओ समोर आले नाहीत तर असे होऊ शकत नाही. लग्नात बाकीच्या पाहुण्यांसह वधू-वर आजकाल डान्स करतात, एकेमकांना हार घालायच्या वेळी थोडी मज्जा करतात. पण नुकतेच असे काही समोर आले आहे की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. होय, नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (viral video on social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं लग्नात एकमेकांना हार घालण्याच्या तयारीत आहे पण हार पहिल्यांदा कोण घालणार यावरून दोघांमध्ये वाद झाल्याच दिसत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वधू-वर पुष्पहार घालण्यासाठी पुढे येत असताना, वराने आधी हार घालायलाच हवा, असा आग्रह धरला. त्याच वेळी, वधू देखील वराच्या गळ्यात हार घालण्यासाठी खूप उत्साहित आहे. दोघांनाही घरातील सदस्य खांद्यावर उचलून घेतेतात, तेव्हाच वधू-वरांमध्ये वाद सुरू होतो, दोघेही पहिल्यांदा हार घालायचा प्रयत्न करतात आणि वरून पडतात. हा व्हिडीओ तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये ३०व्या सेकंदपासून बघायला मिळेल.

(हे ही वाचा: नवरदेवाच्या परदेशी मित्रांनी बॉलीवूडच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral)

(हे ही वाचा: Viral: मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक भारतीय ‘भेळपुरी’ आणि ‘शेवपुरी’वर फिदा!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

वधू-वरांचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून लोकाना आपलं हसू आवरत नाहीये. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अरे लग्न अहे की युद्धभूमी आहे’ तर, इतर वापरकर्त्याने लिहिलं की, ‘काय चाललय भाऊ’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride and groom fight on the stage people said is this a marriage or battle ttg