लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि फोटोशूट केलं जातं. लग्नसोहळा हा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावना काही औरच असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.
तसंच सोशल मीडियावर अनेकदा अशा लग्न समारंभाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा संगीत सोहळा, वराची वरात असे व्हिडीओ जास्त प्रमाणात पाहिले जातात. पण, सध्या लग्नातील एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल.
हेही वाचा… काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
लग्नसोहळ्यात केला राष्ट्रगीताचा आदर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नसोहळ्यासाठी वधू आणि वर त्यांच्या कुटुंबीयांसोबत जमले आहेत. या लग्नसोहळ्यासाठी शाळेतील हॉलचे आरक्षण करण्यात आले असून, शाळेच्या बाहेर फोटोशूट करण्यासाठी वधू वर आणि काही मंडळी थांबली आहेत. पण, तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू होतं आणि आपल्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी तिथल्या तिथे वधू-वरासह सगळे अगदी स्तब्ध उभे राहतात.
हा व्हिडीओ @kb_storiess या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ३.१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
लग्न समारंभातील हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “व्हिडीओ शूट करणाऱ्याला मारलं पाहिजे.” तर दुसऱ्याने, “हीच आहे आपली संस्कृती, भारतमाता की जय” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “व्हिडीओ काढणाऱ्याला लाज वाटली पाहिजे”, तर “ही शाळा सह्याद्री विद्या मंदिर, भांडुप येथील आहे” असे सांगत अनेकांनी कमेंट केली.