Groom vs Bride WWE Fighting Video Viral : लग्नसमारंभ असल्यावर नवरा असो वा नवरी दोघांसाठी हा क्षण अविस्मरणीय असतो. या दिवसी नवरा-बायको नटून सजून स्टेजवर आलेले असतात. पण काही जोडपे पाहुण्यांच्या स्वागत करण्याऐवजी त्यांना जोरदार धक्काच देतात. आताच्या बदलत्या युगात कुणी बोटीवर जाऊन लग्न करतो. तर कोणी हेलिकॉप्टरने एन्ट्री मारून बायकोला सासरी घेऊन जातो. परंतु, नुकतच व्हायरल झालेल्या नवरा-नवरीच्या लग्नाच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर सर्वांना चकीत केलं आहे. कारण नवरा-नवरीत भर लग्नमंडपात WWE सारखी फायटिंग झाल्याचं समोर आलं आहे.

लग्नसमारंभातील रिसेप्शन सेरेमनी सुरु असताना नवरीने नवऱ्याची मान पकडली आणि त्याला दणकन स्टेजवरच आपटला. त्यांच्यात झालेली कुस्ती पाहून सर्व पाहूण्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नवरा-नवरीचं हे भांडण कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.नवरा-बायकोच्या या व्हिडीओत पाहू शकता की, दोघेही जेव्हा स्टेजवर येतात, तेव्हा नवरी अचानक नवऱ्याच्या पोटात लात मारते आणि मान पकडून त्याला जमिनीवर आपटते. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आणि लग्नमंडपात उपस्थित असलेल्या पाहूण्यांना धक्काच बसला.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

नक्की वाचा – VIDEO: भारतात आढळला दुर्मिळ वाघ! रंग आणि आकार पाहिल्यावर चक्रावून जाल, जगभरात होतेय चर्चा

इथे पाहा नवरा-नवरीच्या फायटिंगचा व्हिडीओ

व्हिडीओत दिसतंय की, नवरी WWE सारखा स्टंट मारून नवऱ्याची धुलाई करते. त्यावेळी एक रेफ्रीही तिथे येतो आणि नवऱ्या खाली पडताच तीन पर्यंत आकडे मोजतो. त्यानंतर तो या फायटिंगमध्ये नवरी विजयी झाल्याचं घोषीत करतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर असं म्हणू शकता की, नवरी WWE ची तगडी फॅन आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट अमेरिकेची कंपनी असून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी या शोमध्ये कुस्तीच्या स्पर्धा खेळवल्या जातात.

नवरा-बायकोचा हा भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा फनी व्हिडीओ पाहून यूजर्सने मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६१ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. एका यूजरने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं, अशा पत्नीशी भांडण करण्याआधी तुम्हाला दहावेळा विचार करावा लागेल. अन्य एक यूजर म्हणाला, हे खूप अजब होतं. मी माझ्या लग्नात अशीच एन्ट्री करेल.

Story img Loader