Viral video: प्रेम अंधळं असतं असं म्हंटलं जातं मात्र आजूबाजूची लोकं आंधळी नसतात. प्रेमासमोर जगाची पर्वा केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र आजची पिढी या गोष्टीचे जास्तीच अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमात पडल्यावर वेळ-काळ नाही बघावा असेही म्हटले जाते मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थीची जाण ठेवणे फार गरजेचे असते. आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे तरुण आजकाल आपले प्रेम व्यक्त करताना घाबरत नाहीत, रोखठोकपणे ते आपली मतं मांडतात मात्र बऱ्याचदा नको त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागतात, यामुळे इतर लोकांना याचा त्रास होत असतो.
आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. मात्र यावेळी चक्क नवरा नवरीनं आपल्याचं हळदीत मर्यादा ओंलाडली आहे. आजूबाजूला पाहुणे, मित्र-मंडळी यांचा विचार न करता बेभान झाले. आता तुम्ही म्हणाल त्यांनी असं केलंय तरी काय? तर त्यांनी चक्क सर्वांसमोरच एकमेकांनी किस केलं आहे. यावेळी लोक आपल्याला बघत आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाहीये. कशाचीच पर्वा न करता हे कपल बेभान झाल्याचं दिसत आहे.त्यामुळे व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी टीका केली आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DG95mS_z0qU/?utm_source=ig_web_copy_link
कुटुंब आणि नातेवाईकांसमोर हळदी समारंभात वधू-वरांचा जवळचा क्षण शेअर करतानाचा व्हिडिओ वादाला तोंड फोडत आहे. हा व्हिडीओ thewebnetworks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत टीका केलीय. असे सार्वजनिक प्रदर्शन पारंपारिक हिंदू लग्नाच्या रीतिरिवाजांशी जुळते का असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
एकानं म्हंटलंय की, हे असे प्रकार हल्ली वाढले आहेत. तर आणखी एकानं, अरे त्यांचं आयुष्य त्यांना जे करायचंय ते करुदेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.