Bride Dance Viral Video : पतली कमरीया मोरी गाण्यावर नाचण्याचं वेड अनेकांना लागलं असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. शाळेतील वर्गातही शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत या भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स करतानाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भोजपूरी गाण्यांवर रील बनवण्याची क्रेज वाढत असून तरूणी जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहेत. आता तर भर लग्नमंडपात एका नवरीला पतली कमरीया गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांसमोरच एक नवरीने जबरदस्त ठुमके लगावल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
हा व्हिडीओ @meerakumawat2 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. लग्नमंडपात डीजेवर पतली कमरीया गाणं सुरु होताच नवरीने भन्नाट ठुमके मारायला सुरुवात केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नवरी स्टेजवर डान्स करत असतानाचा तिच्यासोबत असलेले मित्र मंडळीही या गाण्यातवर थिरकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सासरी गेल्यानंतर नवरीने पतली कमरीया गाण्यावर डान्स करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
इथे पाहा व्हिडीओ
एका नेटकऱ्याने म्हटलं, “खूप सुंदर दीदी”. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं “जबरदस्त डान्स”. तर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी पाठवत नवरीच्या डान्सचं कौतुक केलं.पतली कमरीया मोरी गाण्यावर काही तरुणींनी भन्नाट डान्स करून रील्स बनवत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या गाण्यावर बनवलेल्या व्हिडीओजला इंटरनेटवर नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतानाही दिसतो आहे. हा भोजपुरी गाणं दिवसेंदिवस इंटरनेटच्या जगात सुपरहीट होताना दिसत आहे. गाण्याचे बोल सुरु होताच अनेकांना लग्नमंडपात थिरकायला आवडतं असल्याचं अशाप्रकारच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.