Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी घोड्यावर बसून डान्स करताना दिसतेय.

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News LIVE Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्न मंडपाबाहेर वर आणि वधू वेगवेगळ्या घोड्यांवर बसले असून यावेळी गाण्याच्या तालावर नवरी सुंदर डान्स करताना दिसत आहेत. नवरीचा हा डान्स पाहून आसपास असलेले इतर लोकही तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. मात्र, यावेळी दुसऱ्या घोड्यावर बसलेला नवरदेव शांत बसलेला दिसत आहे. वर-वधूचे हे वेगळे कॉम्बिनेशन पाहून व्हिडीओ “परफेक्ट जोडी, ती उत्साही आणि तो शांत”, असे लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा: ‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @makeovers_by_madhura या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘व्वा, सुंदर’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘नवरी खरंच खूप उत्साही आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘आयुष्यातील सुंदर क्षण’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘जबरदस्त.’

Story img Loader