Indian Wedding Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी एखाद्या धक्कादायक क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो.काहीतरी वेगळ हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक नवरी अशीच बाईकवर स्टंट करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून आणि नवरीचे खूप कौतुक करत आहेत. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीच्या पोशाखात एक मुलगी बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. ती शेतात बाईक चालवत आहे. हे पाहून आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ @be_harami ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. हे लोक वेळ, काळ, जागा, समारंभ अगदी कशाचाही विचार न करता आपलं प्रदर्शन सुरु करतात. अशाच एका हौशी तरुणीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाठीवर बॅग अन् खांद्यावर हात; सायकलवर जोडप्याचा रोमान्स, VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळत असून यामध्ये काही हसवणारे असतात तर कधी रडवणारे. मात्र यामध्ये काही व्हिडीओ फारच विचित्र असतात. काही लोक प्रसिद्धीसाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट केली, ‘होंडा बाईक असावी’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भावा वहिनी सापडली…’