Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.लग्नादरम्यान अचानक वराचा मित्र मंडपात पोहोचतो. तो वराच्या कानात अशी कुजबुजतो की वधूचे कान टवकारतात. वधू ताबडतोब भांडणे सुरू करते आणि शेवटी लग्नच मोडते. नक्की काय घडते ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेव्हाही कुणाचं लग्न ठरतं तेव्हा नातेवाईकांना लग्नात बोलवलं जातं. नवरदेव आपल्या खास मित्रांना लग्नात बोलवतो. पण जर याच मित्रामुळे लग्न मोडलं किंवा नवरीने लग्न करण्यास नकार दिला तर? अशीच एक घटना समोर आली आहे. नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की, जयमालानंतर वधू-वर मंडपात बसले आहेत. वधू तिच्या बहिणीशी बोलत आहे, जेव्हा वराचा मित्र येतो. तो हळूवारपणे वधूवर काही पैसे ठेवतो. यानंतर तो वराला पैसेही देतो. दरम्यान, तो वराच्या कानात काहीतरी कुजबुजायला जातो. वराचा मित्र म्हणतो काय झालं भाऊ, त्यांनी रशियन मुलीला लग्नाआधी घरी बोलावलं होतं. वधूने या मित्राचे विधान ऐकले. यानंतर तिने केलेला गोंधळ पाहून वरालाही भीती वाटू लागते. वधूने रशियनऐवजी गर्लफ्रेंड शब्द ऐकलं. अशा स्थितीत ती स्टेजवरच्या वराला विचारू लागते, काय बोलावे, गर्लफ्रेंडचा काय अर्थ आहे? लग्नाआधीही तुम्ही माझ्याशी इतकी वर्षे बोलत होता, मग ही गर्लफ्रेंड कोण? वर समजावून सांगतो की आम्ही लग्न करणार आहोत, या गोष्टींकडे लक्ष देऊ नको मात्र वधू भडकते आणि म्हणते की, तुझे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असताना माझ्याशी लग्न का केले? नवरदेवाला काय करावं काही सुचत नाही आणि मग तो डोक्यावर हात लावून बसतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 