Bride entry dance video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते.लग्नामध्ये नवरीने डान्स करणे सध्याचा ट्रेंड आहे. नवरींचे अनेक डान्स व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहे. असाच एक नवरीचा डान्स व्हायरल झाला आहे. सध्या अशाच प्रकारचा लग्नातील नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वांना आवडत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालताना दिसतो आहे.
ग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी भन्नाट असा डान्स केला आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नवरी भारी हौशी आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थक्क झाल्या आहेत. साधारणपणे नवीन नवरी या शैलीत दिसत नाहीत. सासरच्या घरी ती सुरुवातीला लाजाळू असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी नवरी जराही न लाजता बेभान नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही नवरी आपल्या नवऱ्यासाठी हा डान्स करत आहे. “मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाखामंधी एक पोरगा पाहिजे गोरा गोरा” या गाण्यावर ही नवरी भर मांडवात नवरदेवासमोर डान्स करत आहे. यावेळी पाहुणे मंडळीही या नवरीला पाहतच राहिले आहेत. तर नवरदेव तर लाजून लाल झाला आहे. तुम्हीच पाहा व्हिडीओमध्ये नवरदेवाची रिअॅक्शन..
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर nihit_healt या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.