Wedding bride dance video: लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि खास क्षण असतो. लग्न ठरल्यापासून ते लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात नवरी फुल धम्माल करत असते. मग कधी हळदीत कुटुंबियांसोबत केलेला धम्माकेदार डान्स असो वा लग्नाच्या दिवशी नवरदेवासाठी केलेला डान्स. सध्या सोशल मीडियावर एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्वता: च्या हळदीत अफलातून असा डान्स केलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ संपूर्ण परिसरता मांडव घातलेला आहे. जिथे स्वत:नवरी उभी आहे. “गोरी गोरी नवरी मांडवा खाली” या मराठमोळ्या गाण्यावर नवरी तिच्या कुटुंबियांसोबत डान्स करत आहे. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DEHq08hT_C8/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> VIDEO: “करमन लगन” खानदेशी गाण्यावर नवरा-नवरीनं हळदीला केला भन्नाट डान्स; नातेवाईकही पाहतच राहिले

हा व्हिडीओ सोशल मीडियावर akshada_om या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी या व्हिडीओला “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride dance in her haldi function on marathi song video goes viral on social media srk