Bride Haldi Dance Video:  लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बॅंजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्न होऊन सासरी जाणारी नवरीदेखील अगदी या हळदीत मनसोक्त नाचते. हळद प्रत्येक नवरीसाठी अगदी खास असते.

सोशल मीडियावर लग्नसमारंभातील असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यात हळदीतील नवरीच्या डान्सचे व्हिडीओ याआधी तुम्ही पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात हळदीने माखलेली नवरी जबरदस्त डान्स करताना दिसतेय.

नवरीचा डान्स व्हायरल (Bride Dance Video)

लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हळदी समारंभात नवरी अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हळदीने माखलेली नवरी जबरदस्त डान्स स्टेप करत एन्जॉय करताना दिसतेय. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरदेखील खूप आनंद दिसतोय, व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या नवरीचं कौतुक केलंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @malvaniphotographervlogs इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला असून “नवरीचा हळदीतील खतरनाक डान्स” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.५ मिलियन जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

नवरीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “इतकचं आनंदी राहा नेहमी”, तर दुसऱ्याने “असं वाटतंय नवरी खूप मस्त डान्सर आहे” अशी कमेंट केली; तर एकजण कमेंट करत म्हणाला, “ताई जोमात, बाकी सगळे कोमात” तर एकाने “बापरे, नवऱ्याचं काय खरं नाही आता” अशी कमेंट केली.