सोशल मीडियावर लग्नातील वेगवेगळे व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ नवरा-नवरीच्या ग्रॅण्ड एन्ट्रीचे असतात, तर काही गिफ्ट प्रँकपासून ते विधी आणि काही मनोरंजक घटनांमधील धमाल मस्तीचे असतात. काही व्हिडीओ तुम्हाला खूप हसवतात. लग्नामधला असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओचा लोक भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.
लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. सोबतच काही ठिकाणी तर हमखास नवरीला डान्स करताना आणि नवरोबाच स्वागत करताना बघत असतो. गेल्या तीन चार वर्षांपासून ही एक नवीन पद्धत जणू रुजू झाल्यासारखी वाटते. जी चांगली ही आहेच. कारण स्वतःच्या लग्नात केवळ एका ठिकाणी मंडपात बसून राहण्यापेक्षा नवरा नवरीने डान्स करणं आणि त्या क्षणांचा आनंद घेणं केव्हाही चांगल आहे. पण ही पद्धत अगदी गेल्या काही वर्षातील आहे असं वाटायचं आम्हाला आणि आपल्याला. पण याला काहीसा छेद देणारा हा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला लग्नाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवरदेव आणि नवरी एकत्र चालत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक मित्र आणि नातेवाईकही आहेत. अचानक एक गाणं वाजू लागतं. तिथे नवरदेवाचे काही मित्र नाचू लागतात. त्यांना पाहून नवरीलाही स्वतःवर आवर घालता आला आणि ती सुद्धा थिरकू लागते. अगदी खुल्या मनाने ही नवरी सर्वांसमोर नाचू लागते. नवरीचा इतका जबरदस्त डान्स पाहून नवरदेव सुद्धा चकित झाला. इतकंच काय लग्न मंडपात बसेलेल पाहुणे देखील आश्चर्यचकित होतात. हे सगळे पाहूणे सुद्धा नंतर नवरीसोबत नाचू लागतात.
आणखी वाचा : अन् बघता बघता कागदाप्रमाणे पूल वाहून गेला…हे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अतिशय दुर्मिळ ‘ब्लॅंकेट ऑक्टोपस’ला कधी डान्स करताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
नवरदेवाच्या चेहऱ्यावरही हसू येतं…
या व्हिडीओमध्ये नवरदेवाची प्रतिक्रिया पाहायला मिळते. नवरीला नाचताना पाहून त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. तो डान्स करण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु क्षणाचा आनंद घेताना तो दिसत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत. या व्हिडीओला जवळपास २२ हजार लाईक्स मिळाले आहेत. हे शेअर करणाऱ्यांची काही कमी नाही.