लग्न हे आयुष्यातील असे वळण असते त्यांनंतर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य बदलते. लहानपणापासून प्रत्येकजण लग्न होताना पाहतो तेव्हा प्रत्येकजण मनात स्वत:चे स्वप्न रंगवतो पण प्रत्यक्षात जेव्हा तो क्षण आयुष्यात येतो तेव्हा फार कमी जणांना तो क्षण आनंदाने जगता येतो. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी स्वत:च्या लग्नाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगते आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरी मनसोक्त नाचताना दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचा व्हिडीओ खूप आवडला आहे
म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे पण ते आनंदाने जगता यायला पाहिजे. व्हायरल व्हिडीओ पाहून आनंदाने प्रत्येक क्षण कसा जगता येतो हे समजेल. व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर sukiideep नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट आहे. सुकी जाधव नावाच्या तरुणीचे अकांउट आहे जी व्हिडीओ क्रिएटर देखील आहे. सुकीने स्वत:च्या लग्नातील व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने भन्नाट डान्स केलेला दिसत आहे.
हेही वाचा – धक्कादायक! मटणाच्या नावाखाली लोकांना खायला देत होते ‘मांजराचे मांस’; पोलिसांनी १००० मांजरांची केली सुटका
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या हळदीचा डान्स”. “मला प्रितीच्या झुल्यात झुलवा” या गाण्याच्या तालावर ही नवरी थिरकताना दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचा डान्स आणि उत्साह प्रंचड आवडला आहे. आतापर्यंत ३७ हजारच्या आसपास लोकांनी व्हिडीओ लाईक केले आहे. व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहे आणि तरुणीच्या डान्सचे कौतूक करत आहे.
हेही वाचा – टायरवर चढवले टायर, जुगाड करून तयार केली चारचाकी बाइक; Viral Video पाहून लोकांनी उडवली खिल्ली
अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला,”व्वा फारचं सुंदर” तर दुसरा म्हणाला, “आयुष्यातील आनंद क्षण” , तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “अप्रतिम डान्स” चौथा व्यक्ती म्हणाला, “फार सुंदर डान्स केला ताई साहेब”