भारतातील लग्न, भव्य सजावट आणि अनेक विधींसाठी ओळखले जातात पण सतत सुरु असलेले लग्नातील विधींमुळे नवरा-नवरी अगदी थकून जातात. लग्नाचे विधीच इतके असतात कुटुंबीय, नातेवाईकही थकून जातात. मग नवरा-नवरीची तर काय अवस्था होत असेल याची कल्पना करू शकता. तुमचे लग्न झाले असेल तुम्हाला याचा अनुभव नक्कीच असेल. इतक्या विधी करताना अनेकदा झोपही येते. अशाच लग्नमंडपात पेंगणाऱ्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गरम तव्यावर बेसनपीठाबरोबर टाका ही गोष्ट; ५ मिनिटांत तेलकटपणा होईल गायब

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. @futra_baisa_banna1 नावाने शेअर केला आहे. पारंपारिक राजस्थानी पद्धतीने लग्न सुरू आहे. नवऱ्याने सोनरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर नवरीने लाल रंगाचा लेंहागा परिधान केला आहे. लाल रंगाची ओढणी घेऊन पदर घेतला आहे. दोघे लग्नाचे विधी करताना दिसत आहे. बराच वेळ सुरु असलेल्या विधीमुळे नवरीला झोप येत असल्याचे दिसत आहे. लग्न मंडपात बसल्या बसल्या नवरी पेंगत आहे. नवरदेवाच्या लक्षात येताच तो हळूवारपणे अगदी प्रेमाने तिला पायाला स्पर्श करून तिला जागे करतो. नवरी जाग येताच पुन्हा नीट बसते. नवरा -नवरी यांच्यातील प्रेमाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे.

हेही वाचा – कांद्यामध्ये ‘हे’ तेल टाकून पेटवा वात? भन्नाट ट्रिक वापरून पाहा, मच्छर, पाल आणि उंदरांपासून मिळू शकते सुटका

हा मनमोहक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला, सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओ पाहिल्यानंतर भावूक होत आहेत आणि व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने कमेंट केली, “नवरादेवाकडून खूप गोड प्रतिसाद मिळाला.” दुसर्‍याने लिहिले: “अरे वा, हे खूप मोहक आहे!” तिसऱ्याने लिहिले: “खूप गोंडस!” चौथ्याने लिहिले, “हे खूप सुंदर आहे.” पाचव्याने लिहिले, “मला वराची प्रतिक्रिया खूप आवडली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride falls asleep in mandap groom priceless reaction to wake her up wins hearts viral video snk