लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय खास दिवस असतो. या दिवशी प्रत्येक गोष्ट नीट व्हावी, आपल्या मनासारखे सर्व व्हावे अशी वर आणि वधू यांची इच्छा असते. यासाठी खूप महिन्यांअगोदर पासून तयारी सुरू केली जाते. प्रत्येक कार्यक्रमासाठी नीट प्लॅनिंग केले जाते. पण कितीही नियोजन केल, अगदी वेडिंग प्लॅनर्सना जबाबदारी दिली तरी काहीनाकाही गोंधळ होतोच आणि त्या गोंधळाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. तर काही असे अनपेक्षित किस्से घडतात, जे आठवून आयुष्यभर आपल्याला हसू येत राहील. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काय घडलं या लग्नात जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लग्नाचे विधी सुरू असल्याचे दिसत आहे. हे विधी सुरू असताना वधूला झोप अनावर होते आणि तिची डुलकी लागते. स्वतःच्या लग्नात अस कोणी झोपत का? असा प्रश्न पडुन याचे आश्चर्य तुम्हालाही वाटत असेल. या महिलेने स्वतः याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर करत याचे कारण सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रकारे प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, काही ठिकाणी रात्रभर हे विधी सुरूच असतात. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेनेच हा व्हिडीओ शेअर करत झोप येण्यामागचे कारण सांगितले आहे. त्यांचे लग्नाचे विधीदेखील रात्रभर सुरू होते, त्यामुळे सकाळ झाल्यावर थकव्यामुळे मला झोप येत होती असे तिने सांगितले. लग्नामध्ये वर आणि वधू मुख्य आकर्षण असतात, अशात जर त्यांची डुलकी लागली तर हे दृश्य पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

व्हायरल होणारा व्हिडीओ :

हा जुना व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होतं आहे. ‘Bettered suitcase’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.