Groom and Bride viral video: लग्न सराईचा सीजन सुरु झाला असून सोशल मीडियावर एकाहून एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नवरा-नवरी भर लग्नमंडपात थिरकतानाचे व्हिडीओही इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच नव वधू-वरांच्या लग्नातील पोट धरून हसण्यासारखे धमाल किस्सेही समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार एका लग्न सोहळ्यात झाल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. प्री वेडिंग शूटसाठी आणि लग्न सोहळ्यात फोटोग्राफ्री करताना केलेली घाई कशी हास्यास्पद ठरते, हे एका व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. नवऱ्याने स्टेजवर नवरीसोबत असं काही केलं, जे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण नवऱ्याच्या अदांमुळे नवरी चक्क स्टेजवरच पडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओला मिळाले 90 लाखांहून अधिक व्यूज

व्हायरल झालेला हा व्हिडीओ लग्न सोहळ्यातील एका फोटो शूटचा आहे. सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी जबरदस्त फोटो काढण्याचं वेडं हल्लीच्या तरुणांना लागलं आहे. लग्नातही नवरा-नवरी भन्नाट डान्स करून थिरकतानाचे फोटो व्हायरल झालेले आहेत. या व्हिडीओतही नवऱ्यासोबत भन्नाट पोज देण्याच्या नादात नवरीला चक्क स्टेजवरच पडली. नवरा फोटो काढण्यात इतका दंग झालेला असतो की, नवरीला स्टेजवर सावरताही येत नाही. सुंदर वेशभूषा परिधान करून नटलेल्या नवरा-नवरीला फोटो काढण्याचं प्रचंड वेड असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण नवऱ्याने फोटोशूट काढताना नवरीकडे लक्ष न दिल्याने ती स्टेजवर खाली पडते आणि नवऱ्यालाही स्वत:सा सावरणं कठीण जातं.

नक्की वाचा – नाद केला या पोरानं! टी शर्ट काढलं अन् चक्क मगरींच्या कळपातच मारली उडी, मगर अंगावर चढल्यावर काय घडलं? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

jaipur_preweddings नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर इतका धुमाकूळ घालतोय की, ९० लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर ३ लाख ५७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलं नाहीय. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. काही नेटकरी नवऱ्याच्या बाजूने प्रतिक्रिया देत म्हणतात, अनेकदा लेहंग्याच्या वजनामुळं अशी फजीती होत असते. तसंच अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, लग्नाच्या आधी व्यायामशाळेत जाणं गरजेचं आहे. हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांचं जबरदस्त मनोरंजन झालं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride falls down on stage as groom did not handle him while doing romantic photoshoot marriage ceremony funny video viral on instagram nss