Bride groom dance video: सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावून प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा साखरपु्ड्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा.

सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकार आणि इंफ्लूएंसर्सचेही डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. डान्स व्हिडीओच्या शर्यतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच सहभाग पाहायला मिळतो. अशाच एका नवरा नवरीनं आपल्याच हळदीच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे. ‘पुष्पा-2’ सिनेमातील नव्याकोऱ्या रोमँटिक गाण्यावर क्युट एक्सप्रेशनसह नवरीनं केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बहुचर्चित सिनेमा पुष्पा-2च्या ‘अंगारोका’ या कपल साँगवर भन्नाट डान्स केला आहे. नवरीचे एक्सप्रेशन देखील लय भारी आहेत. यावेळी नवरीनं केलेला डान्स पाहून नवरदेवही लाजला आहे. पुढे रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. 

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. 

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @allubabloo या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. मात्र बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.