Wedding groom and bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका नवरा नवरीने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि या आनंदात त्यांनी त्यांची हळद चांगलीच गाजवली. यावेळी नवरा नवरीने केलेल्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे.
लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरीची हळद आहे आणि यावेळी नवरा नवरीच्या आनंदाला पारा उरला नाहीये. दोघांनीही हळदीत भन्नाट डान्स केला आहे. “सपनोमें मिलता हैं ये मुंडा मेरे सपनो मैं मिलता हैं” या गाण्यावर दोघानींही ठेका धरला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ unaad_lekru नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “त्याच्यासोबत बघितलेलं स्वप्न सत्यात उतरल्यावर” असं लिहलं आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.