सोशल मीडियाची एक गम्मत असते, ती म्हणजे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. लग्नातील कॉमेडी आणि डान्सचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नवरा आणि नवरीचेही जोमात डान्स करतानाचे व्हिडीओ आता पर्यंत तुम्ही बरेच पाहिले असतील. लग्नात नवरा-नवरी अगदी बिनधास्त नाचण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. परंपरांना फाटा देत नव्याने काही गोष्टी आत्मसात करण्यात भारतीय आनंद मानतात. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात नवरा नवरीने कोणताही धांगडधिंगा डान्स न करता आपल्या परंपरेला वाव देत चक्क क्लासिकल डान्स केलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लग्नातले धांसू डान्स व्हायरल होत असताना नवरा नवरीचा हा क्लासिकल डान्स लोकांना खूपच आवडू लागलाय.

लग्न-कार्यात अनेक बंधने असतात. पण तुम्ही जगात कुठेही जा… लग्नात नाचण्याचा कार्यक्रम फिक्स असतो… आधी लग्नाच्या वरातीत पाहुणे मंडळी, मित्र, नातेवाईक, गावकरी नाचायचे. आता नवरा-नवरीच नाचायला सुरुवात करतात आणि ते असा काही डान्स करतात की, लग्नाचा माहोलच एकदम बदलून टाकतात. पण हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये शास्त्रीय संगीत वाजत असल्याचे ऐकू येत आहे आणि त्यानंतर नवरा नवरी डान्स फ्लोअरवर एन्ट्री करतात. दोघेही सुरुवातीपासूनच इतका जबरदस्त डान्स करतात की कोणाचीच त्यांच्यावरून नजर हटत नाही. यामध्ये नवरा नवरीचं एकमेकांसोबत असलेलं बॉण्डिंग पाहण्यासारखं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता? होय, ड्रायव्हर विनाच धावू लागलं ट्रॅक्टर! पाहून तुम्ही म्हणाल, ‘जादू’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नवरीला उचलायला गेला अन् सर्व पाहूण्यांसोर धाडकन कोसळला…VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ theweddingbrigade नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लग्नातला हा हटके प्रयत्न लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओमधील नवरा नवरी दोघेही उत्तम डान्सर आहेत. दोघांचाही ताळमेळ उत्तर प्रकारे बसलेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख १० हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.