Viral video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या नवरदेवाचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा राग येईल मात्र नंतर तु्म्हीच त्याचं कौतुक कराल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये भटजींनी नवरदेवाला वचन देत असल्याचे तुम्हाला दिसेल. पहिले वचन म्हणून, भटजींनी विचारले की आपल्याला एखाद्या तीर्थस्थळी किंवा धार्मिक स्थळी किंवा इतरत्र जायचे आहे का आणि जर आपल्या पत्नीलाही तसे वाटले तर तो तिला सोबत घेऊन जाईल की नाही? यावर वराने उत्तर दिले की तो नक्कीच नेईल.

पुढे आणखी एका वचनाबद्दल सांगताना भटजी म्हणाले की समजा जर वधूच्या आईवडिलांनी काही कारणास्तव तिला तातडीने घरी बोलावले, अशावेळी तुम्ही घरी नसाल तर ती तुमच्या परवानगीशिवाय स्वत:चा निर्णय घेऊन माहेरी जाऊ शकते का? यावर वर उत्तर देतो ‘‘नाही’’

त्याचं उत्तर ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं. पण पुढे तो संदर्भ देत म्हणाला की, जर असं झालं तर, तिने मला सांगावं, मी माझ्या हातातील सर्व काम सोडून तिच्यासोबत जाईन, तिची साथ देईन. वराचं हे उत्तर ऐकून मंडपातील शांतता हस्यात बदलली, यानंतर लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागले आणि वरचं कौतुक करु लागले. तुम्हाला पहिल्यांदा राग येईल मात्र नंतर तु्म्हीच त्याचं कौतुक कराल..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात; तरुणीचा संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @HasnaZaruriHai या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून, नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom mandap video trending on social media panditji explain groom about marriage promises funny video viral srk