Wedding Video: सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये नवरा- नवरीने केलेला डान्स असो किंवा किंवा पाहुण्यांनी केलेल्या करामती असो. लग्नाच्या दिवशी नवरा- नवरीनंतर जर कोणाला मान असतो तो म्हणजे मेव्हणीला. होय, मेव्हणी फक्त नवऱ्याचे पायतील जोडे लपवत नाही तर अधूनमधून त्यांना त्रास देखील देत असते. लग्नाच्या वेळी अनेक पद्धती असतात. त्यातीलच काही पद्धतीमध्ये मेव्हणीवर उखाणे म्हटले जातात. यातील काही उखाणे मजेशीर असतात तर काही मनाला भिडणारे असतात. सध्या असाच काहीसा लग्नकार्यातील प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवऱ्याने मेव्हणीकडे अशी काही मागणी केलीय की मंडपातील सगळी लोकं त्याच्याकडे बघतच राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवऱ्याने मेव्हणीकडे केली भलतीच मागणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत आणि यावेळी उखाणे घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी सासू नवऱ्याला उखाणे घ्यायला सांगते. नवरा हसत उखाणे घ्यायला सुरुवात करतो. तो पहिला उखाणा घेत असताना असं म्हणतो की मी पुढचा उखाणा तेव्हाच सांगेन जेव्हा मला मेव्हणी ५ किस देईल. हे ऐकून मंडपात जमलेले सर्वजण हसायला लागतात आणि नवरीचा घरच्यांनाही आश्चर्य वाटते, कारण नवरा कधी अशी मागणी करेल असं कोणालाही वाटले नव्हते. यावेळी नवरीच नव्हे तर तिचे कुटुंबीयही आश्चर्यचकित होतात आणि हसू लागतात. हे ऐकून मेव्हणीही हसू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: Video: अरे कुणी तरी आवरा हिला! भरधाव वेगात आली अन् थेट तरुणाला धडकली, म्हणाली “तुला…”)

नवरा म्हणाला, ”मला ५ किस..”

( हे ही वाचा: Video: भर लग्नमंडपातच वधू-वर झाले रोमँटिक; लग्नाचे विधी सुरू असतानाच एकमेकांचे चुंबन घेतले अन…)

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ jayan_shu2021 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला एक लाख २० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘लवकर पाठ करून ठेवतो, कोणास ठाऊक, भविष्यात ते उपयोगी पडेल.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘नोटपॅडमध्ये सेव्ह करा, लग्नात सर्वांना उपयोगी पडेल.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘नवरी नंतर चांगला धडा शिकवेल, त्यानंतर नवऱ्याला समजेल.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom video dulha demand kiss from his sister in law jija sali clip viral on social media gps