Bride Groom Video : सोशल मीडियाच्या जगात लग्नाचे अनेक व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जातात आणि ते मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा केले जातात. आपल्या लग्नाचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल व्हावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि नेटिझन्स सुद्धा लग्नातल्या अनेक गमती जमतीचे व्हिडीओ पाहून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. नवरा आणि नवरी हे दोघेही आपल्या लग्नात सारं काही सुरळीत व्हावं यासाठी धडपडत असतात. पण म्हणतात ना, निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. अगदी असंच घडलंय या व्हिडीओमधल्या नवरीबाबत. लग्नात सारं काही नियोजनानुसार झालं तरी काही तरी अशा गोष्टी घडतात ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. सध्या हा असाच मजेदार व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. पाहा काय झालं नक्की या लग्नात ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधले नवरा नवरी लग्नासाठी मंडपात बसले होते. थोड्याच वेळात विधी सुरू होणार आणि हे दोघे लग्नबंधनात अडकणार तितक्यात पावसानं हजेरी लावली. पावसाच्या धारांनी संपूर्ण बॅंक्वेट हॉल न्हाऊन गेले होते. नवरा-नवरीच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी बॅंक्वेट हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या पाहूण्यांनी सुद्धा इकडे तिकडे धावाधाव करण्यास सुरूवात केली. सगळी पावसाचं पाणी साचलं. प्रत्येक लग्नात अगदी सजून धजून लग्न पाहण्यासाठी आले होते. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे या व्हिडीओमधील नवरीची झाली. कारण नववधूच्या वेशभूषेत ही नवरी तिच्या भावी पतीसोबत लग्न मंडपात विधीसाठी बसलीच होती, तितक्यात पाऊस सुरू झाला. लग्नाच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फेरलं.

आणखी वाचा : वरातीत नवरदेवाला पाहिलं आणि खिडकीतच उभी राहून नवरी त्याच्यासोबत नाचू लागली ; VIRAL VIDEO एकदा पाहाच

पावसात भिजून सर्व मेकअप खराब होऊ नये म्हणून सर्व पाहूण्यांनी चक्क ताडपत्रीचा आधार घेतला. प्रत्येकजण ही मोठ्या आकाराची ताडपत्री आपल्या हाताने डोक्यावर पडकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे सारं दृश्य पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यावेळी तिथल्या एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जेव्हा कॅमेऱ्या नवरीच्या दिशेने घेतला जातो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासारखं होतं. जणू काही तिला बोलायचंय, “अरे हे काय झालंय…?”.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! इतकी गर्दी… ‘या’ भागातला करोना पळाला का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा कुत्र्याने रस्त्यावरच्या बेघर माणसाला घट्ट मिठी मारली… हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावूक

या व्हिडीमध्ये जवळपास डझनभर मुली आणि महिला या ताडपत्रीच्या खाली उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ताडपत्रीखाली उभ्या असलेल्या या नवरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लोकांना खूप आवडले आहेत. लग्नाचा हा मजेदार व्हिडीओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, आतापर्यंत या व्हिडीओला ३२ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स देखील शेअर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom video dulhan ka funny moment wedding day cute dulha dulhan viral video trending video heavy rain sudden start in marriage see what happened prp