लग्न म्हटलं की बऱ्याच गोष्टी घडत असतात. लग्न समारंभासाठी अनेक माणसे एकत्र येतात. तर त्यामुळे अनेक वाद निर्माण होण्याची देखील शक्यता असते. हे वाद निर्माण होण्याचं कारण देखील शुल्लक असतं. वाद आपापसात मिटले की मोठी भांडण होण्यापासून टाळता येत. तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. पण, तुम्ही कधी लग्न जेवणात पापड न मिळाल्याने भांडण झालेले पाहिले आहे का? होय, असाच एक प्रकार केरळमधील एका लग्नात घडला आहे. जिथे लग्न जेवणात पापड न मिळाल्यामुळे वरच्या मित्रांमध्ये भांडण झाले आहे. हे भांडण इतक्या टोकाला पोहोचलं की, त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.
पापडावरून भांडण झाले
ही घटना अलप्पुझा जिल्ह्यात घडली आहे आणि हे सर्व एका ‘पापड’मुळे घडले आहे. लग्न जेवणात वराच्या मित्रांनी आणखी पापड मागितल्यावर त्यांना नकार देण्यात आला, यावरून हा भयानक वाद झाला. यावरून सुरुवातीला आपापसात वादावादी झाली, मात्र काही वेळातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर काय झाले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अखेर या प्रकरणात पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वातावरणात किती अराजकता पसरली आहे हे दिसत आहे.
( हे ही वाचा: स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!)
लग्नात वराच्या मित्रांनी बेदम मारहाण केली
लग्नमंडपात दोन गट आपापसात भांडत आहेत, लोक एकमेकांना लाथा-बुक्के मारत आहेत. ही लढत एवढ्या टोकाला पोहोचली की, बॉक्सिंग तर झालेच पण खुर्च्या आणि टेबलही एकमेकांवर फेकले गेले. काही लोकांनी जेवणाच्या टेबलाजवळ ठेवलेल्या बादल्याही मारल्या. ही क्लिप ट्विटरवर एका युजरने शेअर केली होती, ज्याने लिहिले- ‘केरळच्या १०० टक्के साक्षर राज्यात, मेजवानीच्या वेळी वराच्या मित्रांनी पापडाची मागणी केल्यानंतर लग्नात भांडण झाले.’ या चकमकीनंतर अलापुझा पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.