Newly Weds Bride Groom Video: लग्न दोन व्यक्तींना आयुष्यभरासाठी एकत्र आणतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात. तसंच आजकाल लग्न मोठ्या थाटामाटात केलं जातं. अगदी मेंदी, संगीत, हळद असे विधी आणि समारंभ पार पाडत भव्य लग्नसोहळा पार पाडला जातो.
लग्नाचा तो दिवस नववधू आणि वरासाठी अगदी खास असतो. आपल्या जोडीदारासाठी काहीतरी स्पेशल करावं असं त्यांना वाटत असतं. म्हणून अनेकदा लग्नात खास डान्स परफॉरमन्स केले जातात. तर काहीजण आपल्या बायकोला सरप्राइज देत छानसं गिफ्ट देतात. अशीच खास गोष्ट एका नवरदेवाने आपल्या बायकोसाठी केली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.या व्हिडीओमध्ये नवरदेवासह सासरकडच्या मंडळींनी नववधूच्या गृहप्रवेशासाठी जय्यत तयारी केलेली दिसतेय.
हेही वाचा… दारूच्या नशेत महिलेची दादागिरी! कॅबमध्ये ड्रायव्हरबरोबर केलं असं कृत्य की…, VIDEO पाहून येईल संताप
गृहप्रवेश असावा तर असा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच कौतुक वाटेल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेल्या नव्या नवरीचा गृह प्रवेश होताना दिसतोय. पण हा गृहप्रवेश थोडा खास आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की गृहप्रवेशासाठी नवरदेवाने आपल्या बायकोला चक्क उचलून घेतलं. घराजवळ येताच त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. तर नव्या नवरीसाठी संपूर्ण घर फुलांनी सजवलं गेलं आणि रांगोळी काढली गेली.
नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @soniya__1309 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “प्रत्येक मुलीचा असा गृहप्रवेश असावा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
हेही वाचा… ‘उ अंटवा’ गाण्यावर थिरकले नवरीचे आई-बाबा, लेकीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
युजर्सच्या प्रतिक्रिया
कपलचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे सगळं रिल्समध्येच बरं दिसत ओ साहेब खरं काही तरी वेगळंच असतं” तर दुसऱ्याने “क्यूट कपल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “ते सर्व ठीक आहे पण एखाद्याची बायको १०० किलोची असेल तर…”