Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील नवरदेव -नवरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी नवरदेव नवरीचा डान्स असो की कधी स्टेजवरील धक्कादायक घटना चर्चेत येत असतात. सध्या असाच एका नवरदेव नवरीचा लग्नाच्या स्टेजवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला टाकणार होता तितक्यात ती वरमाला तुटली. पुढे नवरदेवाने जे काही केले, ते पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नाच्या स्टेजवरील आहे. या व्हिडीओत नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी उभे आहेत. सुरूवातीला नवरदेव वरमाला नवरीच्या गळ्यात टाकायला जातो तितक्यात वरमाला तुटते. तेव्हा नवरदेव कुणालाही आवाज न देता स्वत:च ती वरमाला बांधतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो.
हेही वाचा : अबब! १० महिन्यांत तब्बल ५२ किलो वजन केले कमी, वाचा तरुणीची प्रेरणादायक स्टोरी
जेव्हा नवरदेव तुटलेली वरमाला बांधत असतो तेव्हा तिथे एक सुटबुटमध्ये व्यक्ती येतो आणि नवरदेव आणि नवरीच्या अंगावरुन पैसे ओवाळून टाकतो. सध्या सोशल मीडियावर या नवरदेवाची जोरदार चर्चा सुरू आहे.
weddingsunfolded या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी नवरदेवाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नवरदेव खूप समजूतदार आहे” तर आणखी एका युजरने लिहिले आहे, “नवरी मुलगी नशीबवान आहे कारण तिला असा जोडीदार मिळाला आहे”