सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतं. अशाच एका नवरा नवरीच्या रोमॅंटिक डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. साधारणपणे लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव- नवरी एकमेकांसोबत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. यावेळी नवरी-नवरदेवाचे डान्स मूव्ह पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी दोघेही खूप आकर्षक दिसत आहेत. नवरदेव काळ्या रंगाच्या टक्सीडोमध्ये देखणा दिसत आहे, तर नवरीही मोरपीशी रंगाच्या घागरामध्ये अतिशय गोंडस दिसत आहे. नवरा नवरी रोमॅण्टिक मूडमध्ये डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या.

आणखी वाचा : सरकारी नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांनी खचाखच भरली ट्रेन आणि बस, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हेअरड्रेसर आपल्या ग्राहकांच्या कपाळावर किस करतानाचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ Natashha____ या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय. मात्र बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर होऊ लागलाय. युट्यूबवर हा व्हिडीओला ३८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom viral video the romantic dance video will mesmerise your eyes watch video
Show comments