लग्न करायचं म्हटलं तर त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. लग्नाआधी जोडप्यांना फोटोशूट करायला आवडते. ज्याला प्री वेडिंग फोटोशूट असे म्हणतात. सध्या आउटडोअर फोटोशूट करणं हा आजकालचा ट्रेंड बनला आहे. यासाठी जोडपे वेगवेगळ्या जागेंची निवड करतात. सध्या अशाच एका आऊटडोअर फोटोशूटची चर्चा होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका जंगलात फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हे जोडपे फोटोशूट करत असताना अचानक एक माकड त्याच्या पिल्लाला घेऊन जोडप्याच्या मध्ये जाते आणि अचानक नवऱ्याच्या मांडीवर चढे. जे पाहून बाजूला उभ्या असलेल्या नवरीलाही धक्का बसतो.
फोटोशूट करत असताना माकडाने केली अडवणूक
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे जंगलामध्ये फोटोशूटसाठी आले आहेत. दोघेही रोमॅंटिक अंदाजामध्ये एकमेकांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. दरम्यान, एक माकड अचानक आपल्या पिल्लाला घेऊन त्याठिकाणी येते आणि नवऱ्याजवळ जाते. माकडाला असं अचानक आलेलं पाहून नवरी घाबरते आणि बाजूला सरकते. त्यानंतर हे माकड नवऱ्याच्या मांडीवर चढून आरामात बसते. कदाचित या माकडालाही फोटोशूट करायचे असेल. यानंतर हे जोडपे माकडासोबतही फोटो काढताना दिसत आहेत.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: माउंट एवरेस्टच्या टोकावरून असे दिसते ‘जग’; पृथ्वीवरील सर्वात उंचीवरून ३६० डिग्रीचा Video व्हायरल)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर she_saidyes नावाच्या युजरने शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या व्हिडिओग्राफरला हा शॉट मिळाला यावर विश्वास बसत नाही, किती मस्त दिवस! माकड आणि तिच्या पाठीवर बसलेल्या पिल्लाचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे.” या व्हिडिओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून लोकं यावर भरभरून कंमेंट करत आहेत. तसंच हा व्हिडिओ झपाटयाने व्हायरल होत आहे.