सोशल मीडियावर लग्न समारंभाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका लग्न समारंभातील असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण “मामा असावा तर असा” असं म्हणत आहेत. त्याचं कारण म्हणजे जयपूरमधील तीन मामांनी आपल्या भाचीच्या लग्नात तब्बल ३ कोटी २१ लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवाय मामांनी भाचीला दिलेली गिफ्ट पाहून विवाह सोहळ्यातील सर्व पाहुणे थक्क झाले होते. राजस्थान हे राज्य हे लग्नातील मायरा प्रथेसाठी खूप प्रसिद्ध आहे. अशातच आता जयपूरच्या नागौर जिल्ह्यात लग्न समारंभादरम्यान जेव्हा मुलीचे तीन मामा पैशांनी भरलेले ताट घेऊन मंडपात आले तेव्हा सर्व वऱ्हाड ते पाहून थक्क झालं.

मामांनी दिल्या ३ कोटी २१ लाखांच्या भेटवस्तू –

हेही पाहा- ट्रेनमध्ये मुलीबरोबर प्रवास करत होता गोंडस कुत्रा, रेल्वेमंत्र्यांनीही शेअर केला Video; म्हणाले “भारतीय…”

तिन्ही मामांनी आपल्या भाचीच्या लग्नात ३ कोटी २१ लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्या. शिवाय जमीन, सोने, चांदी. ट्रॅक्टर, धान्य आणि इतर अनेक वस्तूही त्यांनी भाचीला दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ नागौर जिल्ह्यातील झाडेली गावातील असून भंवरलाल पोटलिया आणि घेवरी देवी यांची मुलगी अनुष्का हिचा विवाह १५ तारखेला पार पडला. यावेळी अनुष्काचे आजोबा आपल्या तीन मुलांसह रामेश्वर, राजेंद्र आणि हरेंद्र करोडो रुपये घेऊन आले होते.

हेही पाहा- रस्त्यावरील खोदकामामुळे गॅस गळती, किचनमध्ये गॅस शिरल्याने घर उद्धवस्त; धक्कादायक घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

भेट म्हणून काय काय मिळालं?

मुलीच्या आईला जेव्हा तिच्या वडिलांची आपल्या मुलीला दिलेल्या भेटवस्ती पाहिल्या तेंव्हा घेवरी देवी आणि तिच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले होते. घेवरी देवीच्या वडिलांनी सांगितले की, अनुष्का ही कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे आम्ही तिला या भेटवस्तू दिल्या. तर अनुष्काला तिच्या लग्नात, ८१ लाख रुपये रोख, 1१६ बिघा जमीन, ३० लाख किमतीची जमीन, ३ किलो चांदी, ४१ तोळे सोने, एक ट्रॅक्टर, धान्याने भरलेली ट्रॉली आणि एक स्कूटी भेट म्हणून देण्यात आली होती. तर गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात आले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मामांनी भेट दिल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, “हुंडा द्यावा लागतो, म्हणून ते वाईट आहे आणि मायरा घ्यावा लागतो, म्हणून तो चांगला आहे”. तर आणखी एकाने हा एक प्रकारचा हुंडाच असल्याचं म्हटलं आहे.